*वैभववाडी दि.२०-:* सिंधु रत्न कला मंचच्यावतीने आंबेडकरी चळवळीत जेष्ठ कवी गायक प्रभाकर पोमेडकर ( पंचशीलनगर, खारेपाटण ) व राहुलकुमार शिंगे ( बुरबांवडे) यांना नुकतीच श्रध्दांजली वैभववाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभवाडी येथे वाहाण्यात आली. प्रभाकर पोमेडकर यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.सिंधु रत्नकलामंच स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच या मंचाचे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण युवक युवतीना त्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देत त्यांच्यातील नवं कलाकार शोधून भविष्याचे महाराष्ट्रातील गायक कवी घडवण्याचे काम या मंचाच्या वतीने करण्यात येणार आहे. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमाला सिंधु रत्न कला मंचचे अध्यक्ष जनीकुमार कांबळे,उपसचिव राजेश कांबळे,कोषाध्यक्ष रवींद्र शिंगे,हिशोब तपासनीस श्रीपत कुसुरकर, बौद्धजन सेवा संघ वैभववाडी चे चिटणीस रवींद्र पवार,उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे,सहसचिव मारुती कांबळे, प्रीतम सुहास जाधव आदी मान्यवर उवस्थित होते. “पोमेडकर व शिंगे या द्वीयीनी बुध्द व बाबासाहेबांचे विचार आपल्या लेखनीतून आणि वाणीतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून समाजप्रबोधनाचे काम केले आहे.सिंधु रत्न कला मंचच्या स्थापनेत या दोघांचा सहभाग मोलाचा होता.संघटनेला त्यांच्या विचारांची गरज असतांना या दोघांनी घेतलेली अकाली एक्सिट सर्वांना धक्का देणारी आहे.त्यांची ऊणीव कायम भासत राहील.अशा श्ब्दात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
वैभववाडी येथे कवी गायक यांच्यावतीने प्रभाकर पोमेडकर व राहुल शिंगे यांना वाहिली श्रद्धांजली
