*💫कणकवली दि.२०-:* गेले पाच दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने खारेपाटण पोलीस स्टेशन अगदी जवळ असलेल्या श्री देव रायरेश्वर मंदिराच्या समोरील संरक्षक भीत कोसळून पडल्यामुळे जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. खारेपाटण येथील प्राचीन रायरेश्वर मंदिराच्या परिसरात चिरेबंदी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती.परंतु मुसळधार पावसाने बांधकामाला तडे जाऊन संरक्षक भिंत कोसळून किल्यावर जाणारी शिवकालीन पानंद तथा घाटी रस्त्यावर कोसळली असून सर्वत्र चिरे माती पसरली आहे. खारेपाटण बाजारपेठ श्री गोसावी हॉटेल येथून श्री दुर्गादेवी मंदिराकडे जाणारी पायवाट तसेच खारेपाटण पोलीस स्टेशनकडे जाणारी पायवाट व खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ कडे जाणारी ही एकमेव ऐतिहासिक चीरेबंदी पायवाट असून संरक्षक भिंत कोसळल्यामुळे शाळेकडे जाणारा रस्ता सध्या बंद झाला आहे.
खारेपाटण येथे संरक्षक भिंत कोसळल्यामुळे केंद्रशाळेकडे जाणार रस्ता झाला बंद
