अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ओरोस-अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक विकासाच्यादृष्टीने जिल्ह्यात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्याची मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्हीक्टर फर्नाडिस व कार्याध्यक्ष लॉरेन्स मान्येकर यांनी केली आहे . या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले .
निवेदनात पुढे म्हटले की , रत्नागिरी कार्यालयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम पाहिले जाते . त्यात सातत्याचा अभाव असल्यामुळे अल्पसंख्यांक समाजाची धावपळ होत असून उपलब्ध योजनांपासून अल्पसंख्यांक समाजाला वंचित राहावे लागत आहे . कागदपत्रांची पूर्तता , संपर्क साधण्यासाठीची धावपळ यातून आज पर्यंत काहीच साध्य झालेले नाही . जिल्ह्यात कार्यालय असावे यासाठी अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे .
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू करण्यासंदर्भात प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परिषदेच्या शिष्टमंडळास सांगितले . तरीही जिल्ह्यात महामंडळाच्या कार्यालयाची निर्मिती करून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासास चालना द्यावी . अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व्हीक्टर फर्नाडिस कार्याध्यक्ष लॉरेन्स मान्येकर , कार्मीस आल्मेडा , बाबलो पिंटो , मेक्सी फर्नांडीस , रिचर्ड डिसिल्वा , अगोस्तीन डिसोजा आदींनी निवेदनाद्वारे केली .
फोटो ओळ:-सिंधूदुर्गनगरी:जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देताना महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व्हीक्टर फर्नाडिस कार्याध्यक्ष लॉरेन्स मान्येकर
