बांदा-शिरोडा मार्गावर अपघाती खड्डे

मार्ग वाहतुकीस निर्धोक करा;रस्त्याच्या दुतर्फा झुडपे तर मध्यभागी खड्ड्यांचे साम्राज्य

*💫बांदा दि.२०-:* बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले भागातून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गेल्या आठ दिवसांत अनेक अपघात घडले. तर दुतर्फा वाढलेली झुडपे नेहमीच अपघातास निमंत्रण देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत मार्ग निर्धोक करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांमधून होत आहे. रस्त्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत धरून चालवावे लागते. ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्ड्यांमुळे वाहनांची सुद्धा वाट लागली आहे. वाहने वारंवार दुरूस्त करावी लागतात. संबंधित विभागाने याकडे अभ्यासपूर्वक लक्ष देत वारंवार निधी खर्ची न घालता एकदाच दर्जेदार काम करणे अपेक्षित असल्याचे, पाडलोस येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page