लॉकडाऊन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई

*💫मालवण दि.२०-:* मालवण बाजारपेठेतील चहा स्टॉल व हॉटेल सायंकाळी ४ नंतर सुरू असल्याचे आढळून आल्याने नगरपालिकेने दोन्ही दुकान मालकांवर प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकप्रमुख गीतांजली नाईक, विजय रावले, बस्त्याव फर्नांडिस, अनिकेत चव्हाण, सुनील चव्हाण, राजा केरीपाळे, रुपेश हडकर यांच्या पथकाने केली. दुकानदारांकडून नियोजित वेळेनंतर दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकाने कायमस्वरूपी सक्तीने सील करण्यात येतील आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती भरारी पथकप्रमुख गीतांजली नाईक यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page