Headlines

Global Maharashtra Breaking News

आम.नितेश राणे यांनी मल्हार नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची केली पाहणी

बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली घटनेची माहिती 💫कणकवली दि.२२-: सांगवे-केनेडी नाटळ येथील मल्हार नदीवरील वाहून गेलेलेल्या पुलाची पाहणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. नाटळ, दारीस्ते,दिगवळे,नरडवे या गावांना जोडणार हा मुख्यपूल असल्याने या सर्वच गावांचा संपर्क तुटलेला आहे.कोसळलेल्या पुलाची पाहणी करून आम.नितेश राणे यांनी त्याच ठिकाणाहून बांधकाम चे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क…

Read Full News

देवगडमध्ये शिवसेनेचा भाजपला शॉक

३ नगरसेवक शिवबंधनात;राणेंना धक्का 💫कणकवली दि२२-: देवगड नगरपंचायतचे भाजपचे विद्यमान नगरसेवक विकास कोयंडे, नगरसेविका हर्षा ठाकूर, श्रुती जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.मुंबई येथे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी शिवबंधन बांधून तिनही नगरसेवकांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे देवगड मध्ये नारायण राणे व नितेश राणेंना शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे.

Read Full News

मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती

घरांच्या भिंती कोसळल्याने अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान;महसूल नायब तहसीलदार प्रदिप पवार यांनी दिली माहिती 💫सावंतवाडी दि.२२-: सावंतवाडी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांच्या भिंती कोसळून अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळण्याचे प्रकारही घडले आहे. मात्र सुदैवाने तालुक्यात…

Read Full News

संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होईल-डॉ.सावंत

💫वेंगुर्ला दि.२२-: मागील ३ वर्षे सातत्याने पावसाचे प्रमाण वाढत असून डिसेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्याला पालवी येऊन मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. याबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामध्ये संशोधन चालू आहे. भविष्यात या संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार असल्याचे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत यांनी केले. फोटोओळी – राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त डॉ.बी.एन.सावंत यांनी मार्गदर्शन…

Read Full News

वेंगुर्लात नद्या, ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ;

भातशेती पाण्याखाली 💫वेंगुर्ला दि.२२-: वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली. गुरुवारी सकाळपासून सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याने तालुक्यातील नद्या, ओहोळांच्या पाण्याच्या वाढ झाली आहे. दरम्यान तालुक्यात सर्व जनजीवन सुरळीत होते.

Read Full News

अनारोजीन लोबो यांनी आमदार नितेश राणे यांच्या नावाचा आधार घेऊ नये

भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा लोबो यांना सल्ल 💫सावंतवाडी दि.२२-: अनारोजीन लोबो यांनी केवळ आपल्या बातमीचा टीआरपी वाढवण्यासाठी आमचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नावाचा आधार घेऊ नये, असा सल्ला भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी लोबो यांना प्रसिद्धी पत्रकातून लगावला. लोबो यांनी आमदार नितेश यांनीच आपल्याला संजू परब यांच्या भानगडी बाहेर काढा, असे…

Read Full News

खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी

व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 💫कणकवली दि.२२-: गेले पाच ते सहा दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसले असून व्यापारी दुकांनामध्ये तर काहींच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.विजयदुर्ग खाडीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांच्या वस्तीमध्ये असणाऱ्या काही खाजगी तसेच सार्वजनिक पिण्याच्या…

Read Full News

कणकवलीत पुराचे पाणी कातकरी झोपड्यात घुसले;

संसार गेला वाहून 💫कणकवली दि.२२-: जाणवली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने हे पाणी अचानक कातकरी वस्तीत आले त्यामुळे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.कणकवली निम्मेवाडी गावळदेव येथे राहत असणाऱ्या कातकरी कुटुंबियांच्या झोपडीत जाणवली नदीचे पाणी घुसले.या कुटूंबाचा धान्य,कपडे,भांडी असा संपूर्ण संसार वाहून गेला.नदीने रौद्ररूप धारण केले त्यावेळी वाड्यावर गरोदर महिला आणि छोटी बालके होती.पुरुष मंडळी…

Read Full News

कनेडी-नाटळ नरडवे रोडवरील मल्हार पूल कोसळला;

वाहतूक पूर्णपणे ठप्प 💫कणकवली दि२२-: मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी-नाटळ नरडवे रोडवरील मल्हार नदीवरील पुलाला तडे जात रस्ता खचला होता आता हा ब्रिजच कोसळला आहे .त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नरडवे , नाटळ, दिगवळे , दारीस्थे या गावांचा संपर्क तुटला आहे. काही दिवसापूर्वी पिलरखालील कॉंक्रीट वाहून सळ्या बाहेर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे…

Read Full News

खारेपाटण ब्रिज वाहतुकीसाठी बंद

शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निर्णय 💫खारेपाटण दि.२२-: मुसळधार पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पूल दुपारी ३ नंतर प्रशासनाच्यावतीने बंद करण्यात आला आहे. खारेपाटण शुक नदीने रौद्र रूप धारण केले असून पुराच्या पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे.तर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज…

Read Full News

You cannot copy content of this page