Headlines

Global Maharashtra Breaking News

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कणकवलीत जोरदार कारवाई

तब्बल 10 लाख 82 हजारांच्या अवैध दारुसह 17 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त *⚡कणकवली ता.०२-:* राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची 10 लाख 82 हजार रुपये किमतीची दारू आणि टेम्पो, मोबाईल असा 17 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कणकवली शहरातील हॉटेल अनंत समोर एक्साईज…

Read Full News

कारिवडे येथे गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई

सतराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त *⚡सावंतवाडी ता.०२-:* कारिवडे- पेडवेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री करत असताना एकाला पोलिसांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. यात सतराशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भागवत आणि त्यांचा टीमनं ही कारवाई केली.

Read Full News

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बांदा-इन्सुली, शेर्लेतील पुरग्रस्ताना दिला आधार *⚡बांदा दि.०२-:* महापुरामुळे नुकसान झालेल्या बांदा- इन्सुली शेर्ले परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक कुटुंबांना ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावीद खतीब यांच्या पुढाकारातून विविध ट्रस्टच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू आणि चारशे पिण्याच्या पाण्याचे बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील आठवडय़ात बांदा परिसरात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा फटका बसल्याने…

Read Full News

चांदा ते बांदा योजनेतील सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत व आंबोली येथील कामात भ्रष्टाचार

नगराध्यक्ष संजू परब यांचा १५ ऑगस्टला उपोषणास बसण्याचा इशारा *⚡सावंतवाडी ता.०२-:* चांदा ते बांदा योजनेतून सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील तसेच आंबोली येथील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबंधित यंत्रणेकडे वारंवार चौकशीची मागणी करून देखील अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. याबाबत…

Read Full News

सुसाट डंपरची मॉलचे सामान घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडक

लाखो रुपये किंमतीचा माल रस्त्यावर विखुरला *⚡दोडामार्ग दि.०२-: सुमित दळवी* दोडामार्ग गोवा सीमेवर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका सुसाट डंपरची गोवा येथे एका मॉलचे सामान घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली त्यामुळे टेम्पोचा एका बाजूने भाग कापला जाऊन आत भरलेला लाखो रुपये किंमतीचा माल सौंदर्य प्रसाधने, गुडनाईट मच्छर व इतर सामान रस्त्यावर…

Read Full News

कणकवलीत ग्रामसेवक संवर्ग समुपदेशन बदलीवरून नाराजी

अन्यायग्रस्त ग्रामसेवक आणि संघटनेने मागितली सीईओंकडे दाद *⚡कणकवली दि.०२-:* -कणकवली पं. स. तील तालुकांतर्गत समुपदेशन बदली प्रक्रियेत प्रशासकीय बदलीनंतर रिक्त होणारी ग्रामपंचायत तसेच विकल्प न दाखवता ग्रामसेवकांवर अन्याय केला असून याबाबत ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे दाद मागितली आहे. 30 जुलै रोजी कणकवली पं स अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील समुपदेशन पद्धतीने…

Read Full News

माडखोल धवडकी परिसरात आलेला पूर नदीपात्रात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळेच

श्री देव विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांचा आरोप;अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कंपनीकडूनच नुकसान भरपाई वसूल करण्याची पालकमंत्र्यांकडे केली मागणी *⚡सावंतवाडी ता.०२:* माडखोल धवडकी परिसरात अतिवृष्टीमुळे आलेला पूर हा नदीपात्रात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळेच माडखोल धवडकी परिसरात महापौर येऊन ग्रामस्थांचे शेती बागायती व घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सदर नुकसानभरपाई ही संबंधित कंपनीकडून वसूल करण्यात…

Read Full News

धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्याने तळाशील ग्रामस्थ संतप्त

१५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा दिला इशारा *⚡मालवण दि.०२-:* सागरी अतिक्रमणग्रस्त तोंडवळी – तळाशीलला कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक संरक्षक बंधारा व्हावा म्हणून अनेक वेळा निवेदन देऊन शासनाचे दरवाजे ठोठावूनही धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्याने संतप्त बनलेल्या तळाशील वासीयांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी 19 वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन निवासी…

Read Full News

मालवणच्या बंड्या खोत मित्रमंडळाचा असाही उपक्रम

चिपळूण व खेड येथील 500 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप *⚡मालवण दि.०२-:* मालवण तालुक्यातील बंड्या खोत मित्र मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यात मधलीवाडी, कातरकरवाडी, रामवाडी, देऊळवाडी, भराडवाडी, बौद्धवाडी, सीमेचीवाडी, रामवाडी आदी वाड्यावर जात ही मदत वाटप करण्यात आली. मालवण तालुक्यात कालावल…

Read Full News

चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा

सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचा चिपळूणसाठी मदतीचा हात *⚡कणकवली दि. ०२-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक ट्रक जीवनावश्यक वस्तूभरून रवाना झाला. कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाकडून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी झेंडा दाखवून तसेच उद्योग व व्यापार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर देसाई…

Read Full News

You cannot copy content of this page