आ किरण पावसकर यांच्या वडिलांचे निधन…

पावसकर गुरुजी म्हणून होते परिचीत

मालवण दि प्रतिनिधी आचरे येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक जगन्नाथ नारायण पावसकर उर्फ पावसकर गुरुजी वय ९४ यांचे सोमवारी सकाळी त्यांच्या आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी आमदार किरण पावसकर आणि डॉ शाम पावसकर यांचे ते वडील होत प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी हे वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले होते.४५ वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न केले.त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. या निमित्त तत्कालिन आमदार अमृतराव राणे यांच्या हस्ते बहिक्षाल शिक्षण केंद्रातर्फे आचरा येथे भव्य सत्कार करण्यात आला होता. सोमवारी सकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले.उपचार सुरू असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. आज सोमवारी दुपारी आचरा देवूळवाडी येथील स्मशान भूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page