शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ पोलीस सर्कलचे संभाजी महाराज चौक असे नामकरण!

*💫कुडाळ दि.१२-:* धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन प्रित्यर्थ शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुपच्यावतीने आज कुडाळ शहरातील पोलीस सर्कल परिसराला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक असे मोठ्या उत्साहात नामकरण करण्यात आले आहे. यावेळी कुडाळ येथील शिवप्रेमी तसेच प्रतिष्ठित नागरिक श्री. विवेक पंडित म्हणाले की, आजपासून या परिसराला कुडाळ मधील नागरिकांनी संभाजी महाराज चौक असे संबोधून आम्हाला सहकार्य करावे. यापुढे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या परिसरात निर्माण करण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे. त्यालाही सर्व कुडाळवासीयांनी सहकार्य करावे. यावेळी संध्याताई तेरसे (नगरसेविका), सुनील बांदेकर (नगरसेवक), सतीश म्हादळकर, विवेक पंडित(सर), गुरुदास प्रभू, महेश अडसुळे, रोशन ठाकूर, संग्राम सावंत, सुभाष सावंत, स्वरूप वाळके, रोशन ठाकूर, विवेक बोभाटे, किरण कुडाळकर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page