भाजपचा सार्वजनिक बांधकामला घेराव…

प्रश्न बांदा-दोडामार्ग रस्ता दुरुस्तीचा;संजू परब यांच्या नेतृत्वाखाली दिली धडक

सावंतवाडी-: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार लक्ष वेधून देखील अद्याप पर्यंत त्या रस्त्याची दुरूस्ती का केली जात नाही? असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला आहे. तसेच जो पर्यत या रस्तादुरूस्ती करण्या संदर्भात बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यत कार्यालयातून बाहेर पडणार नाही असा पवित्रा भाजप पदाधिकारी घेतला आहे. आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग – बांदा येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात येत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

You cannot copy content of this page