बांदा-दोडामार्ग रस्ता:भाजपच्या आंदोलनाला यश
सावंतवाडी-: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार लक्ष वेधून देखील अद्याप पर्यंत त्या रस्त्याची दुरूस्ती केली नसल्याचे भाजपने घेराव घालत बांधकाम अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच ठिय्या मांडला होता. अखेर भाजपच्या आंदोलनाला यश आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी ऑनलाईन प्रकारे निवेदिता आजच्या आज पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर भाजप पदाधिकाऱ्यानी घेतलेला आक्रमक पवित्रा मागे घेतला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब,बांदा सरपंच अक्रम खान पंचायत समिती सदस्य शितल राऊळ,डि.के.सावंत मंकरंद तोरसकर,विनोद राऊळ,एकनाथ नाडकर्णी बाळा अकेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
