बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष कदम यांचे आवाहन
*💫मालवण-:* १४ एप्रिल रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आपल्या घरी साजरी करावी. गावात बुद्ध विहार असल्यास फक्त गावातील वाडीतील बांधवांनी फिजिकल अंतर ठेवून साध्या पद्धतीने जयंती साजरी करावी. आरोग्यविषयक सूचना काटेकोर पाळाव्यात, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम व सरचिटणीस भाऊ कासार्डेकर यांनी समस्त बौद्ध बांधवांना केले आहे.
