Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी १०५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार २५० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ३०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १०५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कासार्डे येथे कारवाई

गोवा बनावटी दारूसह मुद्देमाल केला हस्तगत *⚡कणकवली ता.०४-:* कासार्डे विजयदुर्ग फाटयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून अवैध दारू वाहतुक करत असलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो ताब्यात घेतला असून गोवा बनावटीच्या मद्याची ४,५७,०००/-किमतीची दारू पकडली आहे.तसेच सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना अखिल शिक्षक संघाचा एक हात मदतीचा

१३१ पूरग्रस्त कुटुंबांना धान्यादी माल व कपड्यांचे वाटप *⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-:* दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील १३१ पूरग्रस्त कुटुंबांना सावंतवाडी येथील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षकांनी धान्यादी माल व कपड्यांचे वाटप करत मदतीचा हात दिला.. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील अनेक कुटुंबाना पुराचा प्रचंड तडाखा बसला होता. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी…

Read Full News

सेवानिवृत्त लष्करी अधिकारी वासुदेव रावराणे यांचे निधन

*⚡कणकवली दि.०४-:* कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ गावचे सुपुत्र सेवा निवृत्त लष्करी अधिकारी सुभेदार वासुदेव गंगाराम रावराणे( वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय लष्करातून सुभेदार म्हणून ते १९७६ साली निवृत्त झाले होते.कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैदयकीय अधिकारी, आणि पतंजलीचे जिल्हा समन्वयक डॉ.तुळशीराम रावराणे यांचे ते वडील होत. लष्करात असतांना १९५३साली कोरिया देशात भारतीय शांती…

Read Full News

बारावीतील यशाबद्दल नांदगाव येथील युसरा नावलेकरचा अबिद नाईक यांनी केला सत्कार

*⚡कणकवली दि.०४-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कु युसरा रफिक नावलेकर हि कणकवली कॉलेजची विद्यार्थीनी बारावी परिक्षेत 92 टक्के मिळवत यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ व पारितोषिक देऊन स्वागत केले व त्या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या . त्यावेळी माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष…

Read Full News

आरोस विद्याविहार कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

*⚡बांदा दि.०४-:* उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यामध्ये अमिषा सुभाष मोरजकर ७९.५० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम आली. रसिका धोंडू गाळेलकर ७४.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गौरी दत्ताराम गावडे ७४.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, सचिव…

Read Full News

पर्वरी विजनरीज गोवा संस्थेकडून कळणे वासियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

*⚡दोडामार्ग ता.०४सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनींग मध्ये भूस्खलन होवून मायनींगची चिखलमय माती सह दूषित पाणी कळणे वासीयांनच्या घरात शिरले असता येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले असून घरातील धान्य तसेच अत्यावश्यक सर्व साधने खराब झाल्याने येथील लोकवस्थीची दयनीय अवस्था झाली असून या आपत्ती मुळे अनेक घरातील चूल अशक्य असल्याने आता खायचे तरी असा…

Read Full News

तेरेखोल नदीच्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाचा उपक्रम *⚡सावंतवाडी ता.०४-:* सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आता नवा आदर्श घालून देत 23 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीच्या महापुरा मध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सह्याद्रीच्या कुशीतून…

Read Full News

मडुरा-सातोसे रस्त्यावरील मोरी पुलाला दुसऱ्यांदा भगदाड

*⚡बांदा दि.०४-:* मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथील मोरीपुलाला जून महिन्यात भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले होते. संबंधित विभागाने माती व दगडाच्या साहाय्याने भगदाड बुजविले मात्र काही दिवसांनी काल त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भगदाड पडल्याने धोका निर्माण झाला आहे. कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने अशी परिस्थिती निर्माण होते, असा आरोप सावंतवाडी…

Read Full News

कणकवली -सावंतवाडी एसटीला अपघात

ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली;हानी टळली *⚡कुडाळ ता.०४-:* कुडाळ पंचायत समिती जवळ कणकवली सावंतवाडी एसटी बस सकाळी आठ वाजता कुडाळ येथे येत असतात ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेल कलंडली.यावेळी या बसमधून सुमारे ३०प्रवाशी प्रवास करत होते.बस एका साइडला अचानक कलंडल्याने बस मधील प्रवाशाने आरडाओरडा केला. परंतु एस टी बस साइडला असलेल्या विद्युत पोलांना अडकून…

Read Full News

You cannot copy content of this page