*⚡बांदा दि.०४-:* उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यामध्ये अमिषा सुभाष मोरजकर ७९.५० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम आली. रसिका धोंडू गाळेलकर ७४.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गौरी दत्ताराम गावडे ७४.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, सचिव सिद्धेश नाईक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कोरोना काळातही शिक्षकांनी महाविद्यालयाची गुणवत्ता शंभर टक्क्यांपर्यंत नेली आहे. याला पालकांनीही साथ दिल्यानेच निकाल शंभर टक्के लागला असल्याचे बाळा परब यांनी सांगितले.
आरोस विद्याविहार कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
