बारावीतील यशाबद्दल नांदगाव येथील युसरा नावलेकरचा अबिद नाईक यांनी केला सत्कार

*⚡कणकवली दि.०४-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कु युसरा रफिक नावलेकर हि कणकवली कॉलेजची विद्यार्थीनी बारावी परिक्षेत 92 टक्के मिळवत यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ व पारितोषिक देऊन स्वागत केले व त्या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या . त्यावेळी माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष रज्जाक बटवाले, माजी राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वरणे ,कणकवली राष्ट्रवादी शहर सरचिटणीस गणेश चौगुले, डाॅ अनिल काबळी, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष आसिफ बटवाले रफिक नावलेकर आदि मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page