राज्य उत्पादन शुल्क विभागाची कासार्डे येथे कारवाई

गोवा बनावटी दारूसह मुद्देमाल केला हस्तगत

*⚡कणकवली ता.०४-:* कासार्डे विजयदुर्ग फाटयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून अवैध दारू वाहतुक करत असलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो ताब्यात घेतला असून गोवा बनावटीच्या मद्याची ४,५७,०००/-किमतीची दारू पकडली आहे.तसेच सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता . नगर , जि . अहमदनगर) याला अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार कासार्डे विजयदुर्ग फाटयावर सापळा रचण्यात आला.दोन पंच आणि स्टाफसह खाजगी वाहने तैनात करण्यात आली.कणकवली कासार्डे विजयदुर्ग फाटयावर सापळा रचला असता येणाऱ्या वाहन बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MH – 12 / KP 8533 हे थांबवून तपासणी केली या वाहनाच्या मागील दरवाज्यावर सील लावलेले होते . आतील मालाची बिल्टी वाहनामध्ये नव्हती . त्यामुळे अधिक संशय आल्याने तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्याचे गोवा बनावटीचे १०१ बॉक्स व ५ बिअरचे बॉक्स असे एकूण १०६ बॉक्स मिळून आले . या गोवा बनावटीच्या मद्याची किंमत ४,५७,००० / एवढी आहे . दारु वाहतूक कामी वापरण्यात आलेल्या बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MH – १२ / KP ८५५३ सापडला . सदर मिळून आलेले १०६ बॉक्स व बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MII १२ / KP – ८५५३ व रु ८,५७,००० / – किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला . सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता . नगर , जि . अहमदनगर) यांला अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे . वाहतूककामी वापरण्यात आलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेला आहे . सदरील कारवाई अधीक्षक डॉ . बी . एच . तडवी यांच्या मागदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक जी.सी. जाधव यांनी कारवाई केली . सदर कारवाईमध्ये सहाय्यक दुय्यम निरीक्षकजी . एल . राणे ल , सुरज चौधरी , जे . आर . चव्हाण , श्रीमती स्नेहल कुवेसकर यांनी मदत केली . साजीद शहा , खान यांनी मदत केली . पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी.सी. जाधव आहेत .

You cannot copy content of this page