सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना अखिल शिक्षक संघाचा एक हात मदतीचा

१३१ पूरग्रस्त कुटुंबांना धान्यादी माल व कपड्यांचे वाटप

*⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-:* दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील १३१ पूरग्रस्त कुटुंबांना सावंतवाडी येथील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षकांनी धान्यादी माल व कपड्यांचे वाटप करत मदतीचा हात दिला.. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील अनेक कुटुंबाना पुराचा प्रचंड तडाखा बसला होता. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई यांनी ‘एक हात मदतीचा, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा’ या उपक्रमाखाली सावंतवाडी तालुक्यातील संघटनेच्या सदस्यांना आवाहन करताच संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. जमा झालेल्या मदतीमधून सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, कलंबिस्त, सांगेली, माडखोल, सरमळे, ओटवणे, विलवडे, इन्सुली, बांदा, शेर्ले आदी गावातील १३१ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, तालुकाध्यक्ष संजय शेडगे, सचिव अमोल पाटील, बाबाजी झेंडे, सुभाष सावंत, गुरू राऊळ, नेहा सावंत, सुभाष सावंत, महेश पालव, प्रमोद पावसकर, संदीप, गवस, गुंडू सावंत, वंदना सावंत, रूपेश परब, तेजस्विता वेंगुर्लेकर, दीपक राऊळ, नरेंद्र सावंत, रवींद्र गोसावी, नितीन सावंत, दत्तू सावंत, मनोहर गवस, सरोज नाईक,अजित हिरेमठ,गणेश आत्राम, बाबणी ठाकूर,अर्चना देसाई, मालू लांबर, विजय खरात, हरिभाऊ घोगरे, प्रतिभा घोडगे, शितल गवस आदी पदाधिकारी व संघटनेचे सदस्य तसेच विलवडे सरपंच दळवी, माडखोल सरपंच शिरसाट, माजी उपसभापती कृष्णा सावंत, विनायक दळवी, बबन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संघटनेच्यावतीने जीवनावश्यक व गरजेचे साहित्य पुरविल्याबद्दल पूरग्रस्त बांधवांनी संघटनेचे आभार व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच तत्पर असल्याचे त्यांच्या कार्यामुळे दिसून येत आहे.

You cannot copy content of this page