कणकवली -सावंतवाडी एसटीला अपघात

ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली;हानी टळली

*⚡कुडाळ ता.०४-:* कुडाळ पंचायत समिती जवळ कणकवली सावंतवाडी एसटी बस सकाळी आठ वाजता कुडाळ येथे येत असतात ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेल कलंडली.यावेळी या बसमधून सुमारे ३०प्रवाशी प्रवास करत होते.बस एका साइडला अचानक कलंडल्याने बस मधील प्रवाशाने आरडाओरडा केला. परंतु एस टी बस साइडला असलेल्या विद्युत पोलांना अडकून राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये कोणीही प्रवाशी जखमी झाले नाहीत.परंतु घडलेल्या अपघाता मुळे मात्र प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

You cannot copy content of this page