Headlines

Global Maharashtra Breaking News

त्या वृद्धाची आत्महत्याच…

*⚡सावंतवाडी ता.०५-:* खासकीलवाडा येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या वृद्धाने आत्महत्याच केली यात संशयास्पद असे काहीच नाही असे स्पष्टीकरण तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिले आहे. विश्वनाथ नायर मूळ केरळ असे त्याचे नाव आहे सदर मृतदेहाच्या पायावरील असलेल्या जखमेमुळे रक्तस्राव झाला आहे तो खासकीलवाडा येथे अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होत….

Read Full News

वडाचापाट ग्राम पंचायत इमारत प्रश्न पुन्हा गाजला

स्थायी समितीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेद्वारे निर्णय घेण्याचा ठराव *⚡ओरोस ता.०५-:* वडाचापाट नूतन ग्राम पंचायत इमारत प्रकरण आजच्या स्थायी समितीत चांगलेच गाजले. सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी मालवण गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी ग्रामसभेत जागा स्थलांतर विषय झालेला नाही, असे सांगितले. संतोष साटविलकर यांनी तहकूब सभा नियमात झालेली नाही. त्यामुळे त्या सभेतील ठराव ग्राह्य…

Read Full News

प्रवाशांना आता माहिती मिळणे सुलभ होणार

ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाच्या वैभववाडी येथील सुचना फलकाचे नुतनीकरण *⚡वैभववाडी दि.०५-:* ग्राहक पंचायत व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने तालुक्यातील बसस्थानकातील सुचना फलकाचे नुतनीकरण करण्यात आले. प्रवाशांना आता माहिती मिळणे सुलभ होणार आहे. बसस्थानकात असलेला सुचना फलक हा जीर्ण झाला होता. यावर लिहीलेल्या सूचना ठळकपणे प्रवाशांना दिसत नव्हत्या. ही बाब महाराष्ट्र प्रदेश प्रवासी…

Read Full News

देवगड येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश

मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले स्वागत *⚡देवगड ता.०५-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज देवगड येथील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या उपस्थितीत आज जाहीर प्रवेश केला. तर देवगड संपर्क अध्यक्षपदी दिनेश झोरे…

Read Full News

देवगड-जामसंडे न.पं.ने कोविड सेंटरमधील कचरा साठवुन ठेवल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य

कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडणार:तुषार पेडणेकर *⚡देवगड ता.०५-:* देवगड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये वैदयकिय अधिकारी निवास स्थानाच्या मालमत्तेच्या ईमारतीमध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायतीने कोव्हिड सेंटरमधील ओला व सुका कचरा साठवुन ठेवल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे तरी सदरचा ईमारतीमधील साठवुन ठेवलेल्या कच-याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा देवगड शिवसेना पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे…

Read Full News

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांचे अँड.परिमल नाईक यांनी केले अभिष्टचिंतन

*⚡सावंतवाडी ता.०५-:* माजी केंद्रीय कायदामंत्री व गोव्याचे सुपुत्र रमाकांत खलप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने अँड.परिमल नाईक यांच्यावतीने अभीष्टचिंतन व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक उदय नाईक मकरंद तोरस्कर साई कल्याणकर आदी उपस्थित हाेते.

Read Full News

कणकवली -शिवडाव एसटी फेरी सुरू करणार

शिवसेनेच्या शिष्टमंडळाला प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांचे आश्वासन *⚡कणकवली ता.०५-:* कणकवलीतून हळवलमार्गे शिवडावला जाण्यासाठी सायंकाळच्या वेळेत एसटीची बस फेरी सुरू नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गौरसोय होत होती. या समस्याबाबत माजी जि. प.सदस्य बाळा भिसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयास भेट दिली आणि प्रभारी विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर…

Read Full News

रंगाकर्मींचे क्रांतीदिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे होत असलेले हाल आणि कार्यक्रम बंदी मुळे होत असलेली उपासमार याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्यावर…

Read Full News

चालू आर्थिक वर्षात जलजीवनचे १ टक्काही काम नाही

जलव्यवस्थापन सभेत झाले उघड जल जीवन मिशन योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील गेल्या चार महिन्यात अद्याप १ टक्काही काम झाले नसल्याचे आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाले. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत…

Read Full News

कळणे मायनिंग कंपनीवर कायदेशीर कारवाई करा

रतनभाऊ कदम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे मायनिग उत्खनन करण्यासाठी परवाना दिलेल्या दोन्ही कंपन्यांनी कळणे डोंगर भागात बेकायदेशीररीत्या उत्खनन केल्याने या डोंगराचा भाग कोसळून मायनिंग मधील चिखल आणि माती येथील गावातील नागरिकांच्या घरात, शेतात जावून नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना संबधित कंपन्यांकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी आणि या…

Read Full News

You cannot copy content of this page