ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाच्या वैभववाडी येथील सुचना फलकाचे नुतनीकरण
*⚡वैभववाडी दि.०५-:* ग्राहक पंचायत व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने तालुक्यातील बसस्थानकातील सुचना फलकाचे नुतनीकरण करण्यात आले. प्रवाशांना आता माहिती मिळणे सुलभ होणार आहे. बसस्थानकात असलेला सुचना फलक हा जीर्ण झाला होता. यावर लिहीलेल्या सूचना ठळकपणे प्रवाशांना दिसत नव्हत्या. ही बाब महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ स्वखर्चाने दोन सुचना फलकांचे नुतनीकरण करून दिले.या फलकांवर गाड्यांचे वेळापत्रक ठळक अक्षरात लिहले जाऊ लागले. यामुळे प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.हे नुतणीकरण फलक गुरुवारी बसस्थानकात बसविण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तेजस साळुंखे, वैभववाडीचे वाहतूक नियंत्रक संजयकुमार भोवड तसेच सचिव मंदार चोरगे, कुमार स्वामी, सचिन सावंत, मंगेश चव्हाण, चेतन वाडेकर, पंडित पवार आदी उपस्थित होते.
