Headlines

Global Maharashtra Breaking News

कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश

सरपंच सौ साची फणसेकर यांनी दिलेला शब्द केला पूर्ण *⚡वेंगुर्ला ता.१७-:* तालुक्यातील कोचरा मागासवर्गीय वस्तीचे असलेले हरीजनवाडी हे जातीवाचक नाव बदलून वाडीचे नाव “अशोकनगर” असे नामकरण करून मिळण्यासाठी वाडीतील ग्रामस्थ गेली ४ वर्षे सरपंच साची फणसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत होते. मात्र प्रशासकीय दृष्ट्या याला तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु त्यावर योग्य तोडगा काढून या…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यात आज १६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा २, सावंतवाडी १, जुना बाझार १, माठेवाडा १ तर ग्रामीण भागात इन्सुली ४, माजगाव १, कोलगाव २, मळगाव २, माडखोल १,…

Read Full News

तौक्ते नुकसानीच्या याद्या शिवसेना शाखेत तयार झाल्या

भाजपचे नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप *⚡मालवण ता.१७-:* तौक्ते वादळात प्रशासनाने केवळ शिवसेनेच्या लोकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिली. ज्यांचे खरोखरच नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई कधी देणार ? नुकसान ग्रस्तांच्या याद्या या शिवसेना शाखेत तयार होऊन तहसीलदारांनी केवळ सह्या मारण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार डॉ निलेश राणे…

Read Full News

उसप गावात तीन अस्वलांचे भरदिवसा दर्शन

शेतकरी सागर कळणेकर यांनी कॅमेऱ्यात व्हिडिओ केला कैद *⚡दोडामार्ग ता.१७सुमित दळवी-:* दोडामार्ग येथील उसप गावात तीन अस्वलांचे भरदिवसा दर्शन झाले.उसप येथील शेतकरी सागर कळणेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात त्यांचा व्हिडिओ कैद केला.भरवस्तीत अस्वल दाखल झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Full News

सायकल रायडर्सनी केले २०० किमी पेक्षा अंतर पार

*⚡ओरोस ता.१७-:* 15 ऑगस्ट 2021 रोजी कनक रायडर सायकल क्लबच्या सायकल रायडरनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजाला सायकलचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने दहा किलोमीटर पासून दोनशे किलोमीटर अंतराच्या विविध अंतराच्या सायकल राइड्स पूर्ण केल्या. यामध्ये निशांत चव्हाण 223 किमी, मकरंद वायंगणकर 201 किमी, विष्णू रामागडे 201 किमी, संजय बिडये 75 किमी, योगेश महाडिक 75…

Read Full News

जिल्हा प्रशासनाच्यावतीने “यूपीएससी” साठी उद्या फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सीईओ प्रजीत नायर आणि संजिता महोपात्रा यांचा सहभाग *⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या या संकल्पनेची सुरुवात उद्यापासून होत आहे. बुधवार दि.18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492…

Read Full News

शिरोडा गांधी स्मारकासाठी नियोजित जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात मिळावी

माजी खासदार निलेश राणे यांना सरपंच मनोज उगवेकर यांचे निवेदन *⚡वेंगुर्ला ता.१७-:* तालुक्यातील शिरोडा मिठागर येथील राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या स्मरकासाठीची नियोजित जागा शिरोडा ग्रामपंचायत कडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावावर पुढील कारवाई होण्यासाठी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जि.प. सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे यांनी माजी खासदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी भेट…

Read Full News

रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र मधुकर सावंत यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

*⚡कुडाळ ता.१७-:* कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र श्री मधुकर गणपत सावंत यांना सन -२०२१ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र शासनाकडून *राष्ट्रपतींचे पोलीस पदक* देऊन गौरविण्यात आले आहे. प्रामाणिक व सचोटीने केलेल्या कामाची पोचपावती त्यांना या माध्यमातून मिळाली आहे.त्यांना देण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलीस पदकामुळे कुडाळ तालुक्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. मधुकर सावंत यांचे प्राथमिक…

Read Full News

जिल्हाधिकारी, एसपींकडून खारेपाटण चेकपोस्टवर आढावा ​​

चेकपोस्टवर भेट देत नियोजनाच्या दिल्या अधिकाऱ्यांना सूचना ​ *⚡​कणकवली ता.१७-:* गणेश चतुर्थीसाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जिल्ह्यात दाखल होणार असल्याने प्रशासनाकडून त्या अनुषंगाने खारेपाटण चेकपोस्टवर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, डी वाय एस पी डॉ. नितीन कटेकर, तहसीलदार आर​.​ जे​.​ पवार, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, सहाय्यक पोलीस…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६हजार ८२१कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १,हजार९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page