सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यात आज १६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सबनीसवाडा २, सावंतवाडी १, जुना बाझार १, माठेवाडा १ तर ग्रामीण भागात इन्सुली ४, माजगाव १, कोलगाव २, मळगाव २, माडखोल १, चराठा १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात १५८ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page