*⚡ओरोस ता.१७-:* 15 ऑगस्ट 2021 रोजी कनक रायडर सायकल क्लबच्या सायकल रायडरनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजाला सायकलचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने दहा किलोमीटर पासून दोनशे किलोमीटर अंतराच्या विविध अंतराच्या सायकल राइड्स पूर्ण केल्या. यामध्ये निशांत चव्हाण 223 किमी, मकरंद वायंगणकर 201 किमी, विष्णू रामागडे 201 किमी, संजय बिडये 75 किमी, योगेश महाडिक 75 किमी, संचित खटावकर 31 किमी, प्रतिक जगदीश सावंत 75 किमी, कैलास सावंत 75 किमी, वसुधा माने 10 किमी, उज्ज्वला धानजी 25 किमी, वेदांगी रामागडे 10 किमी, ओम प्रकाश मोर्ये ७५ कि.मी., संदेश मयेकर ७५ कि.मी, अक्षय विखाळे 100 किमी, साहिल मठकर 100 किमी, यशवंत भोसले 100 किलोमीटर अशाप्रकारे या सायकल रायडर्सनी सायकल चालविली.
सायकल रायडर्सनी केले २०० किमी पेक्षा अंतर पार
