चेकपोस्टवर भेट देत नियोजनाच्या दिल्या अधिकाऱ्यांना सूचना
*⚡कणकवली ता.१७-:* गणेश चतुर्थीसाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जिल्ह्यात दाखल होणार असल्याने प्रशासनाकडून त्या अनुषंगाने खारेपाटण चेकपोस्टवर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, डी वाय एस पी डॉ. नितीन कटेकर, तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, मंडळ अधिकारी मंगेश यादव आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लहान वाहनांसाठी लाईन, मोठ्या वाहनांची लाईन या अनुषंगाने जागा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीच्या दृष्टीने देखील काय उपाययोजना करता येतील त्याचा आढावा जिल्हाधिकारी, एसपी यांच्याकडून घेण्यात आला. गणेश चतुर्थी कालावधीत कोणताही गोंधळ होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्याचा सूचना जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.
