कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांना तसेच विधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबतची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा
निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे *⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना तसेच विधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत राहिलेली प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, महिला…
