तहसीलदारांना दिले निवेदन
मालवण दि प्रतिनिधी चले जाव…. चले जाव….. मोदी सरकार चले जाव…अशा घोषणा देत आणि मालवणच्या तहसीलदाराना निवेदन सादर करीत आज मालवण शिवसेनेने महागाई विरोधात आंदोलन छेडले देशात वाढलेल्या महागाईस केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत मालवण तालुका शिवसेनेने मालवण तहसीलदाराना निवेदन दिले यावेळी उपजिल्हाप्रमुख शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख जोगी, नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, तपस्वी मयेकर, संमेश परब, गौरव वेर्लेकर, उमेश मांजरेकर, बाळू नाटेकर, राजेश गावकर, किसन मांजरेकर, प्रसाद आडवणकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, मोहन मराळ, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, नंदा सारंग यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. भडकलेली महागाई आणि घटलेले उत्पन्न यामुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्र सरकारने वाढवलेले दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात आणावेत. अन्यथा सर्वसामान्य जनतेस महागाई भत्ता द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सादर केले. सर्वसामान्य जनतेचा आवाज असलेले हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवा, असे शिवसेनेच्या वतीने प्रशासनास सांगण्यात आले.
