शिक्षक संघाची रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे सुपूर्द

जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिल्या किल्ल्या

सिंधुदुर्गनगरी ता ०६ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी कोरोना काळात अतिशय चांगले योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य केले आहे. आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करतानाच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे हे कार्य लोकाभिमुख असे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आजच्या रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलताना केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज येथील जिल्हा परिषद छत्रपती सभागृहात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्य अध्यक्ष तथा राज्य सल्लागार प्रकाशभाई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर ,वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर, शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्षा विनयश्री पेडणेकर, राज्य संयुक्त चिटणीस म ल देसाई, मृणाली पालव, रेश्मा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्गचे व जिल्ह्यातील शिक्षकांचे कोरोणा काळात बजावलेल्या सेवेबाबत कौतुक केले. कोरोना काळात आरोग्य विभागाच्या बरोबरीने जिल्ह्यातील शिक्षकांनीही चांगले योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. जिल्ह्याला आवश्यक असलेली रुग्णवाहिकेची गरज ओळखून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या रुग्णवाहिकेचा आज लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका देऊन प्राथमिक शिक्षक संघाने लोकाभिमुख असे काम केले आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी बोलताना केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सेवेत एक नव्याने रुग्णवाहिका दाखल होत आहे. या रुग्णवाहिकेचा नक्कीच जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला फायदा होणार आहे असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर ,सभापती डॉ अनीषा दळवी, अंकुश जाधव, शर्वांनी गावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक हे नेहमीच आदर्श नागरिक घडविण्याचे काम करीत आहेत. कोरोणा काळातही त्यांनी चांगले काम केले आहे. आता तर त्यांनी जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका देऊन लोकाभिमुख असे कार्य करून आपला नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रत्येक समजाभिमुख कार्यात जिल्हा परिषद कायम पाठीशी राहील .असे सांगितले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार प्रकाशभाई दळवी यांनी आपले विचार मांडताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करत आलेली आहे. यापुढेही सहकार्य करीत राहील. मात्र त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन प्रशासनानेही सहकार्याची भूमिका ठेवावी. गणेशोत्सव काळात त्यांना कोरोना ड्युटीतून मुक्त करावे असे सूचित केले. त्यानंतर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य सल्लागार प्रकाश दळवी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे ॲम्बुलन्सची चावी देऊन अंबुलन्स जिल्हा परिषदेच्या स्वाधीन करत लोकार्पण केले.

You cannot copy content of this page