*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 49.5 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3404.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 43(3302), सावंतवाडी – 40(3636.1), वेंगुर्ला – 45(2658.8) कुडाळ – 58(3291), मालवण – 35(3670.96), कणकवली – 59(3794), देवगड – 78(3008), वैभववाडी – 38(3875) पाऊस झाला आहे. 00000
देवगड तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पाऊस
