मोती तलावात गणपती विसर्जनसाठी चार बोटी उपलब्ध

नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते बोटींचे शुभारंभ

*⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी मोती तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी चार बोट आणल्या असून या बोटींचे शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष संजू परब यांनी आणलेल्या या चार बोटी मुळे गणेश विसर्जनावेळी नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे त्यामुळे सावंतवाडी नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर,नगरसेवक राजू बेग,नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेवक,मनोज नाईक,नगरसेवीका दिपाली भालेकर, नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे नगरसेविका शुभांगी सुकी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page