भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांची मागणी
आंबोली, ता.७:जिल्ह्याचे प्रवेश द्वार असलेल्या आंबोली बसस्थानक येथे कालपासून कारोना तपासणी केंद्र सुरू झाले. कोरोना सुरू झाल्यापासून याच ठिकाणी हे केंद्र आहे.बसस्थानक ही शासकीय मालमत्ता असल्याने शासनाने या ठिकाणी हे केंद्र सुरू केले.बस स्थानक असल्याने प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.या ठिकाणी नोडल अधिकारी,आरोग्य पथक ,शिक्षक,पोलीस यांची वेवस्थ करण्यात आली आहे. दरम्यान आंबोली हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ करण्याच्या घोषणा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती.शौचालय गेली १० वर्षे बांधून होत नाही.आंबोली मतदारसंघात चौकुळ बेरडकी रस्ता,चुरणीची मूस रस्ता,फौजदार वाडी मुख्यमंत्री सडक योजना,अंतर्गत रस्ते अशी बऱ्यापैकी कामे ही निकृष्ट च झाली आहेत. चुरणी ची मूस रस्ता वर्षभरात पूर्ण उखडला आहे.त्याची पाहणी करून सर्वच कामांची चौकशी व्हावी.आणि ठेकेदारांना काळया यादीत टाकावे.आणि पुन्हा काम हमी कालावधीतील काम करून घ्यावे केवळ एकच ठेकेदार बोगस काम करीत नाही.सर्वांचीच चौकशी व्हावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे.
