मळगाव घाटीतील रस्ता धोकादायक
नूतनीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी – रेडी मार्गावरील मळगाव घाटीतील रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. ठिकठिकाणी पडलेले लहान – मोठे खड्डे, दरीच्या बाजूने खचत चाललेला भूभाग, केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुनाट वृक्ष या आणि अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता पूर्णतः नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहे. मळगाव…
