सत्तेत असताना एकत्र आणि वेगळे झाल्यावर आरोप-प्रत्यारोप

जनतेने आता याना ओळखावे:परशुराम उपरकर यांचा सेना-भाजपला टोला

*💫सावंतवाडी दि.१५-:* शिवसेना-भाजप मध्ये शहरात अपहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु यापूर्वी शिवसेना भाजप एकत्र सत्तेत होते.तेव्हा दिप क केसरकर पालंकमंत्री होते आणी आता हे वेगवेगळे झाल्याने आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. मात्र जनतेने आता ओळख पाहिजे या लोकप्रतिनिधी व ठेकेदाराने जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास केल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना भाजपवर केला आहे. तसेच उपकार पुढे म्हणाले केसरकर यांनी पालकमंत्री असताना येवढा निधी आणल्याची घोषणा करतात मग येवढा निधी आणला तर मग मोठ मोठे कारखाने आणायची घोषणा केली मग ते आता कुठे गेले. जनतेला अजून किती मूर्ख करणार असा देखील सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page