११ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे स्थापना सुवर्ण महोत्सवी आयोजन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या स्थापनेला १६ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत असल्याने या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आजच्या रक्तदान शिबिरात एकूण ११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला १६ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज सिंधुदुर्गनगरी येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक सागर देसाई, जि प ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे, उप अभियंता संजय पुरंदरे, प्रशासन अधिकारी वैभव वाळके आदी उपस्थित राहून त्यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page