⚡बादां ता.२३-:
केणीवाडा, पाडलोस येथे उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘केणीवाडा महोत्सव २०२६’ चे उद्घाटन ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या महोत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला राजन पटेकर, अमिषा पटेकर, महेश कुबल, रत्नप्रभा कुबल, नंदू परब, अविनाश माफणकर, अदिती माफणकर, समीर नाईक, रोहन धुरी, गिरीश नाईक, अवधूत राणे, रोहन सातार्डेकर, शंकर परब, बंटी नाईक, आर्यन केणी, शुभम कोरगावकर, अमित नाईक, मंदार परब, हर्षद परब, रंजन नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सचिन कोरगावकर, ओमकार नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू नाईक यांनी केले. महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
केणीवाडा महोत्सव २०२६ चे अँड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन…!
