पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
*💫वेंगुर्ला दि.१५-:* वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात परूळे येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री आम आमदार श्री दिपक केसरकर,युवानेते श्री संदेश पारकर जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्रीउदय सामंत,आमदार दिपक केसरकर,यांनी उपस्थित पदाधिकारी शिवसैनिक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी सचिन देसाई, तालुका प्रमुख बाळु परब, महिला तालुका संघटक सौ सुकन्या नरसुले, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, शहरप्रमुख अजित राऊळ, विभाग प्रमुख योगेश तेली, रोहित म्हापणकर, महेश सामंत,महिला विभाग संघटिका सौ मनिषा नेवाळकर, विभागातील सरपंच उपसरपंच, शिवसेना पदाधिकारी महिला युवासेना कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
