सा. बां. विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांदा – दोडामार्ग रस्त्यावर पाणीच पाणी

सामाजिक कार्यकर्ते डी.के.सावंत यांचा आरोप

*💫सावंतवाडी दि.१५-:* सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बांदा – दोडामार्ग रस्ता पावसात तुडुंब भरून नदी नाल्यासारखा वाहत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डी.के.सावंत यांनी बांधकामविभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. बांदा ते दोडामार्ग रस्त्याची खूप बिकट परिस्थिती आहे प्रशासन यावर हलगर्जीपणा करताना दिसत आहे. पावसागोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले गटार खुले केलेली नसल्याने रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. बांदा शासकीय विश्रामगृह गेट पासून पुढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत भरवस्तीतून गेलेलय ह्या राज्य महामार्गाच्या आजूबाजूला असलेली घरे यात उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना गेली अनेक वर्ष अन्नासोबत तसेच प्रत्येक श्वासासोबत धूळ खावी लागत आहे मात्र याची कोणी घेतलेली नाही अनेक आंदोलने होऊन फक्त आश्वासन दिले जात आहे मात्र त्या आश्वासनच पुढे काय होत हे त्या अधिकाऱ्यालाच माहित असे बोलत सामाजिक कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच याबाबत तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे असे श्री सावंत म्हणाले.

You cannot copy content of this page