शिक्षकांच्या विविध समस्यांचे दिले निवेदन
*💫ओरोस दि.१५-:* बुधवार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मंञालय मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले
. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेशी झालेल्या चर्चेत ७ वा वेतन आयोग खंड १ व खंड २ मधील ञुटीबाबत,आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही,संच मान्यता प्रक्रिया करणे आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी ना.पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ व दोन्ही विभागातील सचिव यांच्यासमवेत बैठक घेऊन या प्रश्नांबाबत निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन दिले. ग्रामविकासमंञी हसनजी मुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या चर्चेत जिल्हांतर्गत बदल्या आॅगस्ट मध्ये होतील.त्यापुर्वी ञुटींबाबत शुध्दीपञक काढण्यात येईल. बदलीची अट ५ वर्षाऐवजी ३ वर्ष करण्यात येऊन अनफिट फाॅर महिला क्षेञ घोषित करण्यात येईल.विस्थापित व गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या सोयीनुसार बदल्या करण्याचा प्रयत्न राहिल.आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकञीकरण,महिला शिक्षिकांच्या बदलीला प्राधान्य, कोकणातील १० वर्ष अट रद्द करणे.शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत नेमणूका देणेपुर्वी आंतरजिल्हा बदलीचा पुढील टप्पा राबविण्यात येईल, केंद्रप्रमुख भरतीसाठी १० जुन २०१४ चा शासननिर्णय रद्द करुन ५०% पदोन्नतीने व ५०% शिक्षकांमधून परीक्षा घेऊन प्रक्रिया राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य नेते काळूजी बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य संघटक सयाजीराव पाटील,इगतपुरी तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस, इगतपुरी सरचिटणीस सुनिल सांगळे व पदाधिकारी उपस्थित होते.

