सिंधुदुर्गात भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर २२ रोजी धरणे आंदोलन छेडणार:राजन तेली
जिल्ह्यात दारु, वाळू सह अवैध धंद्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार *⚡कणकवली ता.२०-:* त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मालेगाव,नांदेड, अमरावती येथे दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पोलिसांमार्फत अडकवत आहेत.अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तहसील कार्यालसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.सिंधुदुर्ग…
