*⚡मालवण ता.२०-:* स्वच्छ भारत मिशन योजनेतून मठबुद्रुक येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात तीन लाख रुपये खर्चाच्या स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी जनार्दन सावंत, अनिल बुधवळेकर, संभाजी गोलतकर, मारुती गोलतकर, संजय केळुसकर, जिजी केळुसकर, उदय सावंत, पांडुरंग मुळये, ज्युनिअर इंजिनियर माने यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मंदिरात अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या परिसरात स्वच्छतागृह उभारावे ही मागणी उपसभापती राजू परुळेकर यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
मठबुद्रुक विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह उभारणीचा उपसभापती परुळेकर यांच्या हस्ते शुभारंभ
