*⚡मालवण ता.२०-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या ५३ वर्षांपूर्वीच्या एस.एस.सी. १९६८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन प्रशालेच्या मध्यवर्ती सभागृहात उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे हे नववे वर्ष होते. या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. टोपीवाला हायस्कुलच्या एस.एस.सी. १९६८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे एकत्र येता आले नाही. परंतु या वर्षी एकत्र येत आपले नववे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले. यामध्ये मुंबई, पुणे, सांगलीसह इतर ठिकाणचे बहुसंख्य वर्गमित्र व मैत्रिणी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोनामुळे व आजारपणामुळे निधन झालेल्या वर्गमित्रांना आदरांजली वाहण्यात आली व त्यांच्या स्मृतिंना उजाळा देण्यात आला. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केरून पुन्हा दरवर्षी भेटण्याचे, शाळेसाठी हरएक तऱ्हेची मदत करण्याचे, तसेच उपयोगी शिबीरे ठरविण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी सर्वजण मालवणच्या समुद्रातून सहलीला जावून दर्यावर्दी आनंद अनुभवला. या कार्यक्रमासाठी टोपीवालाचे संस्थाचालकांनी सहाय्य केले. मोहन सामंत, प्रकाश कुशे, चंद्रकांत जामसंडेकर, अनिल मालंडकर, पाॅली परेरा यांनी गेट टूगेदरच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री. दिगंबर सामंत, श्री. अविनाश आजगांवकर, सचिव श्री. विजय कामत व मुख्याध्यापक श्री. अवसरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी श्री. व सौ. मोतीलाल वणकुद्रे, सौ. अलका चंद्रकांत जामसंडेकर, श्री. मोहन सामंत, चित्रा/वृषाली मोहन सामंत, रामदास कांदळगावकर, चंद्रकांत जामसंडेकर, सहदेव गवंडी, विजयानंद अणावकर, सुमन देसाई, संध्या सामंत प्रकाश परुळेकर, कृषीतज्ञ राज्य पुरस्कार विजेते जनार्दन रघुनाथ सामंत, रेमेत फर्नांडिस, पाॅली परेरा, श्री. व सौ. निशा जयवंत पाटणकर, अनिल मालंडकर, सौ. स्नेहा मालंडकर, रमेश करंगुटकर, ऍड. अशोक तोरसकर, जगदीश दलाल, प्रकाश कुशे, मिलिंद हिंदळेकर आदी उपस्थित होते. चंद्रकांत जामसंडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार ऍड. प्रकाश तोरसकर यांनी मानले.
टोपीवाला हायस्कुलच्या १९६८ एसएससी बॅचचे स्नेहसंमेलन संपन्न
