अखेर ‘तो’ धोकादायक विद्युत पोल बदलला

नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांच्या प्रयत्नांना यश

*⚡मालवण ता.२०-:* शहरातील मालवण- कसाल हमरस्त्यावरील देऊळवाडा जुना ऑक्ट्राय नाका येथील महापुरुष मंदिरा नजीक जीर्ण झालेला विद्युत पोल धोकादायक बनल्याने तो बदलण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. याबाबत नगरसेवक दीपक पाटकर आणि जगदिश गावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर हा जीर्ण वीज पोल वीज वितरण कंपनीकडून बदलण्यात आला आहे. कसाल- मालवण मुख्य मार्गावर असलेला हा वीज पोल जीर्ण बनल्याने तो कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची भीती होती. त्यामुळे हा पोल बदलण्यासाठी नगरसेवक दीपक पाटकर आणि स्थानिक नगरसेवक जगदीश गावकर यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी शहर अभियंता श्री. भुजबळ यांनी दोन महिन्यांत हा पोल बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा वीज पोल अग्रक्रमाने बदलण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांच्यासह बाळू मालवणकर, कमा गावकर, पांडुरंग फणसेकर, श्री. बांदेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. सदरील धोकादायक वीज पोल बदलण्यात आल्याबद्दल स्थानिकांनी आभार मानले आहेत. तर महावितरणचे शहर अभियंता श्री. भुजबळ यांनी प्राधान्याने हा पोल बदलल्या बद्दल श्री. पाटकर आणि श्री. गावकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page