देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी फराळाचे पाठविले 16 हजार बॉक्स
*⚡कणकवली ता.२०-:* गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून अनाम प्रेम या भक्तिमार्गात कार्यरत असणाऱ्या संस्थेकडून कणकवली नगरपंचायत मधील अग्नीशमन व स्वच्छता कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कणकवलीतील या संस्थेशी जोडले गेलेले नंदू टिकले, संदीप खानोलकर, अविनाश तिरोडकर, नगरपंचायत ची गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, मनोज धुमाळे आदी उपस्थित होते. समाजातील विविध घटकांचे या संस्थेमार्फत नेहमीच कौतुक केले जाते. समाजात अनेक घटक आपआपल्यापरिने काम करत असतात. त्यामुळे या दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचा गौरव व्हावा हा उदात्त हेतू ठेवून ही संस्था प्रसिद्धी च्या झोतात न राहता आपले काम करत असते. यापूर्वी देखील अनेकदा एसटी वाहक, चालक, यांच्यासोबतच पोस्ट डे, पोलीस डे, नर्स डे या संस्थेकडून कर्मचाऱ्यांचा गौरव करत साजरे केले जातात. . कणकवली नगरपंचायत मधील अग्नीशमन व सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करताना अग्निशामन विभागाच्या टीम लीडर ला अग्निशमन विभागातील कामकाज व या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जुन्या अनुभवी लोकांचे अनुभव गाठीशी असावे त्याकरिता एक पुस्तकही भेट देण्यात आले. तसेच नरक चथुर्दशी दिवशी रेल्वेच्या मोटरमन यांनाही फराळ देऊन त्यांचा सत्कार या संस्थेमार्फत केला जातो. तसेच खंडेनवमी दिवशी रेल्वे रुळाची पूजा, रेल्वे गॅंग मन यांचा सत्कार करून ही संस्था समाजातील विविध घटकांपर्यंत पोचत असते. नुकतेच सीमेवर कार्यरत असणाऱ्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकां करिता 16 हजार फराळाचे बॉक्स या संस्थेच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
