*⚡सावंतवाडी ता.२०-:* राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्था, सावंतवाडी या रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या शरीरातील तीन महिन्यांचे ब्लड शुगर चे प्रमाण तपासण्यासाठी पॅथॉलॉजी विभागात hbaic हे मशीन कार्यान्वित करण्यात आले असून, सदर तपासणी अल्पदरात करण्यात येणार आहे. या तपासणीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
ब्लड शुगरचे प्रमाण तपासणीसाठी राणी जानकीबाई रुग्णालयात मशीन कार्यान्वित
