Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण गाबित समाजतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीतर्फे मालवण तालुक्यातील गाबित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ जानेवारी महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार आहे. तरी २०२१-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, डिग्री, शिष्यवृत्ती, बीडीएस आदी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाज विद्यार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रिकेसह गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था मालवण कार्यालय आणि…

Read More

उभादांडा येथिल दशावतारी कलाकार गौतम केरकर याचा भटवाडी येथे सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ला उभादांडा येथिल दशावतारी कलाकार गौतम केरकर कलेतील योगदान बदल त्याचा लक्ष्मीनारायण कला क्रिडा खांबड भटवाडी वेगुर्ला मडळच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . गौतम केरकर हे दशावतार कलेत गेली दोन दशके कार्यरत आहे दशावतार कलेतील प्रसार व प्रचार कार्याबदल याचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला. सध्या ते पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य…

Read More

संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून राबविली स्वच्छता मोहीम

*⚡कणकवली ता.२१-:* संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार – देवगड व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेत शालेय विद्यार्थी हिरिरीने सहभागी झाले होते.यामध्ये प्रामुख्याने विद्युत उपकेंद्र तळेबाजार, वरेरी रोड, तळेबाजार बाजार पेठ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँक या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,…

Read More

वाजपेयी यांच्या जयंतीदिनी भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती कणकवली 21 डिसेंबर (प्रतिनिधी)– माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने , ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे….

Read More

सावंतवाडी नगरपालिकेवर उद्या पासून प्रशासक…

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी नगरपरिषदेची मुदत उद्या दिनांक 22 डिसेंबर रोजी समाप्त होत असून, उद्या पासून सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार उप विभागीय अधिकारी सांभाळणार असून, प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read More

मडुरा हायस्कुलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवा : रमेश परब

*⚡बांदा ता.२१-:* धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलीत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आला आहे. याचे श्रेय हे शिक्षकांचेच आहे. यावर्षीही ही परंपरा कायम राखली पाहिजे असे, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब यांनी सांगितले. मडुरा हायस्कुला दिलेल्या…

Read More

रेकोबा विद्यालयात डॉ. शिरोडकर यांची पुण्यतिथी साजरी

*⚡मालवण ता.२१-:* डॉ. रा. का. शिरोडकर यांनी आपले समग्र जीवन दुर्बल समाज घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेचले. त्यांनी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज त्यांचाच वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, असे प्रतिपादन रेकोबा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शुभदा शिंदोळकर यांनी केले. डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी भूतनाथ येथे डॉ, रा. का. शिरोडकर…

Read More

सुशिलकुमार प्रभू-केळुसकरला विशेष योग्यता श्रेणी प्राप्त

*⚡मालवण ता.२१-:* अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मिरजतर्फे घेण्यात आलेल्या एप्रिल २०२१ च्या सत्रात गायन प्रवेशिका प्रथम परीक्षेत घुमडे येथील सुशिलकुमार दत्तात्रय प्रभू-केळुसकर याला विशेष योग्यता श्रेणी प्राप्त झाली आहे. सुशिलकुमार हा मालवण येथील प्रसिद्ध गायक ऍड. दिलीप ठाकुर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहे. तो येथील टोपीवाला हायस्कूलमधे सातवीमध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र…

Read More

जखमी कबूतराला जीवदान

*⚡मालवण ता.२१-:* मालवण बांगीवाडा येथील सावित्री मेडिकल येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या कबुतरावर मालवणातील पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी प्राथमिक उपचार करत जीवदान दिले आहे. कबुतराच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला सोडून देण्यात येणार आहे. सावित्री मेडिकल येथे जखमी अवस्थेतील कबुतर सापडून आले. याबाबत पक्षीप्रेमी उदय रोगे यांना माहिती देण्यात आली. रोगे यांनी मेडिकलच्या ठिकाणी दाखल होत कबुतराला…

Read More

एस. एम्. हायस्कूल व विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे पोलिसाची नेमणूक करावी

कणकवली शहर राष्ट्रवादी युवकच्यावतीने मागणी *⚡कणकवली ता.२१-:* एस् . एम् . हायस्कूल कणकवली येथील अंडरपास येथे ट्रॅफीक हवालदार नेमणूक करण्यात यावी तसेच विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली कॉलेज रोड येथे पोलीस नेमणूक करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर यांनी कणकवली पोलिस स्टेशन येथे केली आहे. कणकवली पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी युवक कणकवली शहर…

Read More
You cannot copy content of this page