उभादांडा येथिल दशावतारी कलाकार गौतम केरकर याचा भटवाडी येथे सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ला उभादांडा येथिल दशावतारी कलाकार गौतम केरकर कलेतील योगदान बदल त्याचा लक्ष्मीनारायण कला क्रिडा खांबड भटवाडी वेगुर्ला मडळच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . गौतम केरकर हे दशावतार कलेत गेली दोन दशके कार्यरत आहे दशावतार कलेतील प्रसार व प्रचार कार्याबदल याचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला.

सध्या ते पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य मडळ वेगुर्ला या कंपनीत कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ओंकार दशावतार, मामा मोचेमाडकर , चेदवणकर गोरे, आरोलकर, सिध्देश्वर दोडामार्ग, खानोलकर, या मंडळात त्यानी पंधरा वर्षे काम केले. दशावतार कार्याबदल ची दखल घेऊन लक्ष्मीनारायण कला क्रिडा सांस्कृतिक मडळ खाबड मंडळाने केरकर याचा सत्कार केला यावेळी मंडळाचे सुभाष बागवे, हरी परब आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page