*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीतर्फे मालवण तालुक्यातील गाबित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ जानेवारी महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार आहे.
तरी २०२१-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, डिग्री, शिष्यवृत्ती, बीडीएस आदी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाज विद्यार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रिकेसह गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था मालवण कार्यालय आणि गाबित समाज मालवण तालुका कार्यकारिणी उपाध्यक्षा चारुशीला आचरेकर (९४०४३४४३२२) यांच्याकडे ३० डिसेंबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवण गाबित समाज कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालवण गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था येथे तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गंगाराम आडकर, दादा वाघ, महेश जुवाटकर, भाई कासवकर, मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, सहदेव साळगावकर, दीक्षा ढोके, पवनकुमार पराडकर, नरेश हुले, संतोष ढोके आदी उपस्थित होते. बैठकीत जानेवारी महिन्याच्या अखेरीस तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचे ठरले. तसेच कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, शासकीय, सामाजिक, उद्योग, बँकींग अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणा-या तालुक्यातील २० समाजबांधवांचा विशेष गौरव करण्याचे ठरविण्यात आले.
