टोचन केलेल्या कारचे झाले मोठे नुकसान
*⚡सावंतवाडी ता.२१-:* दाणोली बाजारपेठ जवळील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने टॉइंग व्हॅनला अपघात झाला असून, याच टॉइंग व्हन ने टोइंग केलेली अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा अपघात आज सकाळी घडला असून, याबाबत अधिक माहिती अशी की… कोल्हापूर येथील युवक गोव्यातील आपले काम आटपून पुन्हा कोल्हापूरला जात असताना त्यांची अल्टोकार दाणोली येथे नादुरुस्त झाली ती गाडी सावंतवाडी येथे गॅरेजमध्ये नेण्यासाठी त्यांनी आंबोली येथून टोइंग व्हॅन मागवली, कार टोइंग करुन नेत असतांना टोइंग व्हॅन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दाणोली येथे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साटम महाराज भक्त निवासाच्या ठिकाणी दोन्ही गाड्या गटारात कलंडल्या यामध्ये अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत केली.
