सुशिलकुमार प्रभू-केळुसकरला विशेष योग्यता श्रेणी प्राप्त

*⚡मालवण ता.२१-:* अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मिरजतर्फे घेण्यात आलेल्या एप्रिल २०२१ च्या सत्रात गायन प्रवेशिका प्रथम परीक्षेत घुमडे येथील सुशिलकुमार दत्तात्रय प्रभू-केळुसकर याला विशेष योग्यता श्रेणी प्राप्त झाली आहे. सुशिलकुमार हा मालवण येथील प्रसिद्ध गायक ऍड. दिलीप ठाकुर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहे. तो येथील टोपीवाला हायस्कूलमधे सातवीमध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page