रेकोबा विद्यालयात डॉ. शिरोडकर यांची पुण्यतिथी साजरी

*⚡मालवण ता.२१-:* डॉ. रा. का. शिरोडकर यांनी आपले समग्र जीवन दुर्बल समाज घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेचले. त्यांनी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज त्यांचाच वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, असे प्रतिपादन रेकोबा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शुभदा शिंदोळकर यांनी केले. डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी भूतनाथ येथे डॉ, रा. का. शिरोडकर यांची ७३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष विश्वास गावकर, सेक्रेटरी जयश्री हडकर, भगवान लुडबे, उमेश शिरोडकर, गणेश प्रभुलीकर, चंद्रकांत चव्हाण, प्रदीप वेंगुर्लेकर, शुभदा शिंदोळकर, दीपक डगरे, संदीप बोडवे, अक्षता धुरी, नंदकिशोर डगरे, प्रवीण कुबल, संभाजी कोरे, श्रीनाथ फणसेकर, रामचंद्र गोसावी, मिताली मोंडकर, रोहिणी दिघे, चंद्रकांत चव्हाण, दत्तात्रय गोसावी, यशवंत गावकर, रघुनाथ त्रिंबककर आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. रम्याता कुर्ले, शुभम लुडबे, गायत्री सरमळकर, विठ्ठल मिठबावकर यांचा रेकोबा विद्यालय व लायन्स क्लबतर्फे आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला.

You cannot copy content of this page