Headlines

मडुरा हायस्कुलच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवा : रमेश परब

*⚡बांदा ता.२१-:* धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलीत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आला आहे. याचे श्रेय हे शिक्षकांचेच आहे. यावर्षीही ही परंपरा कायम राखली पाहिजे असे, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब यांनी सांगितले.

मडुरा हायस्कुला दिलेल्या सदीच्छा भेटी प्रसंगी श्री. परब बोलत होते. यावेळी परब व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय भाईप उपस्थित होते. मुख्याध्यापक दशरथ घाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page